Showing posts with label Indian Army. Show all posts
Showing posts with label Indian Army. Show all posts

Thursday, May 6, 2021

पोलीस भरती Online लेक्चर्स 2021

पोलीस भरती Online लेक्चर्स ....

मराठी लेक्चर्स

गणित लेक्चर्स

बुद्धिमत्ता लेक्चर्स

GS लेक्चर्स

विज्ञान लेक्चर्स

मोटिव्हेशनल लेक्चर्स

मैदानी प्रशिक्षण

भूगोल लेक्चर्स

सिग्मा अकॅडेमी whatsapp ग्रुप जॉईन करा (click here)

जय हिंद मित्रांनो, वरील विषयांच्या लिंक ला क्लीक करून दररोज किमान प्रत्येक विषयांचे एक ऑनलाईन लेक्चर ऐका ,तसेच त्याच्या नोट्स काढा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी  तुम्हाला याचा १००% फायदा होईल . तसेच सोबत दिलेल्या whatsapp ग्रुप मध्ये जरूर add व्हा व कोणत्याही शंका असतील तर आम्हाला ग्रुपवर अवश्य शेअर करा .... जय हिंद  9850845094 (Thakur Sir)

सिग्मा करिअर अकॅडेमी ,Youtube चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा (Click Here)



Thursday, April 9, 2020

पराक्रम भारतमातेच्या वीर सैनिकांचा-वीर सैनिक मनोज कुमार पांडे

आज आपण अश्या एका वीर जवानाचा इतिहास समजून घेणार आहेत. ज्यांच्या शौर्याची दखल घेत २००३ साली एलओसी कारगिल या नावाचा चित्रपट  प्रदर्शित करण्यात आला आणि त्यांची भूमिका अभिनेता अजय देवगणने साकारली होती.

वीर सैनिकाचे नाव - मनोज कुमार पांडे
जन्म- २५ जून, १९७५
सीतापूर, उत्तर प्रदेश.
मृत्यू- ३ जुलै, १९९९ (वय २४) बटालिक सेक्टर, कारगिल
सैन्यशाखा- भारतीय सैन्य
हुद्दा- कॅप्टन
सैन्यपथक- १/११ गुरखा रायफल्स
लढाया व युद्धे- कारगिल युद्ध
पुरस्कार- परमवीरचक्र (मरणोत्तर)

▪️ वैयक्तिक जीवन
लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ह्यांचा जन्म उत्तरप्रदेश मधील सितापूर येथे झाला. मनोज कुमार हे श्री गोपीचंद पांडे ह्यांचे पुत्र होते. मनोज हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे होते. त्यांचे वडील हे एक छोटे व्यापारी होते.मनोज ह्यांचे शिक्षण लखनौ येथील सैनिकी प्रशालेत झाले. ह्यांना मुष्टियुद्धात कमालीचा रस होता. मनोज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पदवीधर झाले. त्यांचे तेव्हा पासूनच १/११ गुरखा रायफल्स मध्ये जाण्याचे स्वप्न होते. भारतीय सेनेच्या परीक्षेच्या मुलाखतीत त्यांना विचारले गेले होते-"तुम्हाला सेनेत का यायचे आहे?" तेव्हा मनोज म्हणाले-"मला परमवीर चक्र पदक मिळवायचे आहे." त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सेनेतील सर्वोच्च शौर्य पदक मिळालेही पण मरणोत्तर.

▪️ कारगिल युद्ध
मनोज ह्यांनी पाकिस्तानी घुसखोरांना ११ जून १९९९ ला बटालिक सेक्टरमधून परतवून लावले. त्यांनी त्यांच्या बरोबरील सैनिकांचे नेतृत्व करीत जुबर शिखरावर ताबा मिळवला. हे शिखर ताब्यात येणे त्यावेळी संघर्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. परिस्थिती लक्षात घेत मनोज यांनी आपल्या सैनिकांच्या समूहाला एका अरुंद लांबट उंचवट्यावर नेले. त्यामुळे त्यांना शत्रूच्या जागा लक्षात आल्या. उद्दिष्ट पूर्ण झालेले नसताना पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर गोळीबार सुरू केला. मोठे साहस दाखवून मनोज ह्यांनी तेवढ्याच प्रमाणात गोळीबाराचे उत्तर दिले. खांद्यावर व पायावर गोळी लागूनसुद्धा मनोज यांनी हार मानली नाही व पाकिस्तानी बंकरांपर्यंत जाऊन तेथे दोन सैनिकांना मारून पहिले बंकर ताब्यात घेतले. हेच या लढाईतले महत्त्वाचे वळण होते. आपल्या नेत्याच्या साहसाने प्रेरित होऊन बाकीच्या सैनिकांनीसुद्धा आपल्या शत्रूवर हल्ला चढवला. आपल्या जखमांकडे दुर्लक्ष करत मनोज ह्यांनी प्रत्येक बंकरामधील शत्रूच्या सैनिकांना मारायला सुरुवात केली. सर्वात शेवटचे बंकर ताब्यात घेतल्यावर अत्यंत घायाळ झाल्याने मनोज बेशुद्ध पडले. तोपर्यंत त्यांच्या सहकार्‍यांनी सर्व बंकरे ताब्यात घेतली होती.

▪️ ऑपरेशन विजय
कॅप्टन मनोज ह्यांनी कारगील जिंकण्यासाठीच्या ऑपरेशन विजयमधील काही हल्ल्यांमध्ये भाग घेतला व काही घुसखोरांना परतवले. २ जुलै १९९९च्या मध्यरात्री खालुबर पलटणची चढाई अंतिम टप्प्यात असताना शत्रूकडून हल्ला झाला. मनोज ह्यांना शत्रूची स्थिती कळण्यासाठी चढाई करण्यास सांगितले व लवकरात लवकर प्रतिहल्ला करण्यास सांगितले. कारण दिवसाच्या प्रकाशात मनोज ह्यांचा समूह दिसू शकला असता.

▪️ मृत्यू
न घाबरता कॅप्टन मनोज यांनी शत्रूच्या पहिल्या ठिकाणावर हल्ला केला, तेथे त्यांनी शत्रूच्या दोन सैनिकांना ठार केले. तसे दुसर्‍या ठिकाणावर हल्ला करून तेथेही दोन शत्रुसैनिकांना मारले. तिसर्‍या ठिकाणी हल्ला करताना. त्यांना छातीवर व पायांवर जखमा झाल्या. तरीही न घाबरता त्यांच्या जखमांची काळजी न करता त्यांनी त्यांच्या गटाचे नेतृत्व केले व चौथ्या ठिकाणी हातगोळा टाकून ते ठिकाण उद्‌ध्वस्त केले. त्या वेळी त्यांना कपाळावर गंभीर जखम झाली. शेवटी खूप जखमा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

▪️कॅप्टन मनोज यांचे शेवटचे शब्द होते 'ना छोडनु' (नेपाळी भाषेत) ('त्यांना सोडू नका'.). अशा प्रकारे मनोज यांनी वीरता, अदम्य साहस, कुशल नेतृत्व आणि कर्तव्याच्या प्रति समर्पण दाखविले आणि भारतीय सेनेच्या परंपरेत सर्वोच्च बलिदान दिले.

▪️ सन्मान
मनोज कुमार पांडे यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारतीय सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे वडील श्री गोपीचंद मनीष यांनाही ५२व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी भारताच्या राष्ट्रपतींकडून एक पुरस्कार प्राप्त झाला. मनोज पांडे देशात त्यांच्या त्यागासाठी एक हुतात्मा मानले जातात. ते सर्व लोकांसमोर एक आदर्श आहेत.

▪️ मनोज ह्यांची दैनंदिनी
मनोज ह्यांची एक स्वतःची डायरी होती. त्या डायरीमध्ये ते जे काही शिकले ते लिहीत असत. त्यांनी त्यात एक वाक्य लिहले आहे- काही लक्ष्ये इतकी योग्य असतात की ती हरणे सुद्धा शानदार असते!

सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी 
9850845094 /9403803087 /8668502903

Wednesday, April 8, 2020

पराक्रम भारतमातेच्या वीर सैनिकांचा-वीर सैनिक रामा राघोबा राणे

आजपर्यंत आपण ऐकत आलो सैन्यात मोठमोठ्या पदांवर पंजाब, हरयाणा या राज्यातील लोक कार्यरत असतात. पण आपल्या महाराष्ट्रातील असे एक पराक्रमी सैनिक आहेत ज्यांचा आपण संपूर्ण इतिहास वाचणे गरजेचे आहे.
▪️ नाव - रामा राघोबा राणे (२६ जून, १९१८:हावेरी, कर्नाटक - ११ जुलै, १९९४:पुणे, महाराष्ट्र) ▪️भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी होते.

▪️राणे १० जुलै, १९४० रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची नाईक (कॉर्पोरल) पदी नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या तुकडीस म्यानमारमध्ये जपान्यांविरुद्ध लढण्यास पाठवली गेली. तेथील आराकान मोहीमेतून त्यांची डिव्हिजन माघार घेत असताना त्यांच्या सेनापतीने राणे व इतर काही सैनिकांना बुथिदौंग येथे मागे राहण्याचा हुकुम दिला. गावाजवळची मोक्याची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी त्याना दिली गेली. काम झाल्यावर रॉयल नेव्हीकडून त्यांची उचलबांगडी होणार होती. काम झाल्यावर आरमारी मदत आलीच नाही. राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूचा सुळसुळाट असलेली नदी पार करीत कूच केली व बाहरी येथे आपल्या गोटात येउन मिळाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सार्जंट)पदी बढती मिळाली.

▪️भारताला स्वातंत्र्य मिळाल्यायवर राणे यांची तैनात कोर ऑफ इंजियनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये झाली. तेथे त्यांना सेकंड लेफ्टनंटचे पद दिले गेले.

▪️परमवीर चक्र
१९४८च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने गमावलेले झंगर गाव भारतीय सैन्याने १८ मार्च, १९४८ रोजी परत मिळविले आणि तेथून राजौरी कडे कूच केली. ८ एप्रिल रोजी चौथ्या डोगरा बटालियनने बरवाली पुलासह राजौरी काबीज केले. तेथून पुढील प्रगती शत्रूने पेरुन ठेवलेल्या सुरुंग आणि इतर अडथळ्यामुळे रोखली गेली. यावेळी राणेंच्या ३७वी एल्गार फील्ड कंपनीला रस्ता मोकळा करण्यास पुढे केले गेले. त्यांनी काम सुरू करताच पाकिस्तानी  सैनिकांनी तोफांचा मारा सुरू केला. त्यात राणेंचे दोन सैनिक ठार झाले आणि स्वतः राण्यांसह इतर पाच सैनिक जखमी झाले. या स्थितीतही राणे यांनी उरलेल्या सैनिकांसह आपले काम सुरुच ठेवले आणि रणगाड्यांसाठी मार्ग मोकळा केला. पुढील बारा तासात जखमी अवस्थेत राणे व त्यांच्या सैनिकांनी रणगाड्यांसाठी वेगळा व सोपा रस्ता तयार केला. शत्रूच्या माऱ्यातच हे काम सुरु होते.

▪️१० एप्रिल रोजी राणे यांनी पहाटे उठून पुन्हा रणांगणाची वाट धरली. मशीनगनचा मारा आणि सुरुंगांचे स्फोट होत असताना त्यांनी रणगाड्यांच्या वाटेत पडलेली पाच देवदाराची झाडे बाजूला केली. रणगाडे येथून पुढे गेल्यावर अजून एक अडथळा त्यांच्या समोर आला. शत्रू या भोवतालच्या टेकड्यांवर दबा धरून बसलेला होता व अडलेल्या रणगाड्यांवर मारा करीत होता. राणे स्वतः एका रणगाड्यात बसून पुढे गेले व भीषण गोळीबार होत असताना रणगाड्याची आस घेउन त्यांनी अडथळ्यास सुरुंग लावून फोडून काढले व चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी केली.

▪️११ एप्रिल रोजी राणे पुन्हा एकदा युद्धभूमीवर पोचले आणि सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले.

▪️राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले आणि अधिक शेकडो जखमी केले.

▪️ त्यांच्या या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला.

▪️ ३१ जानेवारी २०२० ला बॉंबे सॅपर्सच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, श्रीमती राजेश्वरी राणे यांनी हे परमवीर चक्र लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक घरांत राहण्यापेक्षा लष्कराकडेच राहीले तर अधिकाऱ्यांना व जवानांना त्यातून प्रेरणा मिळत राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

▪️युद्धानंतर राणे लष्करात राहिले व २५ जून, १९५८ रोजी मेजरपदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर १९५८ पासून ते ७ एप्रिल १९७१ पर्यंत राणे पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत होते.१९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती घेतली.

▪️त्यांचे ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले व एक मुलगी होते.

▪️ शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले १५ तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. एम.टी. राम राघोबा राणे, पीव्हीसी हे जहाज ८ ऑगस्ट, १९८४पासून २५ वर्षे सेवेत होते.

▪️ कारवार येथे आयएनएस. चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आहे.

सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग वर्दे गाव
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी. 
9850845094 /9403803087 /8668502903

पराक्रम भारतमातेच्या वीर सैनिकांचा-वीर सैनिक संजय कुमार

वीर सैनिक नाव - संजय कुमार
▪️ जन्म - ३ मार्च, १९७६ (वय: ४४) कलोल बकैं, बिलासपूर जिल्हा, हिमाचल प्रदेश
▪️ सैन्यशाखा - भारतीय सेना (Indian Army)
▪️ हुद्दा - नायब सुबेदार
▪️ सैन्यपथक - १३ जम्मू काश्मीर रायफल्स
▪️ लढाया व युद्धे - कारगिल युद्ध
▪️ पुरस्कार - परमवीरचक्र

⏹️लष्करात भरती होण्यासाठी संजय कुमार यांनी केलेला अर्ज तीन वेळा नाकारला गेला होता. चौथ्यांदा अर्ज केल्यावर त्यांना लष्करात भरती केले गेले. यादरम्यान ते नवी दिल्लीमध्ये टॅक्सी चालवित असत.

⏹️कारगिल युद्धाच्या ऐन मध्यावर ४ जुलै, १९९९ रोजी संजय कुमार आपल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या १३व्या बटालियनमधील तुकडीचे नेतृत्त्व करीत एरिया फ्लॅट टॉप या भागाची टेहळणी करीत होते. पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी संजय कुमार कडा चढून गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तेथील पाकिस्तानी ठाण्यावर मोठी कुमक होती. नंतर होऊ घातलेल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या आक्रमण या ठाण्याने सहज कापून काढले असते. हे पाहून ते एकटे कड्यावरुन पुढे सरकले आणि ठाण्याच्या एका बाजूस जाउन त्यांनी एकांडा एल्गार केला. ते पाहताच पाकिस्तान्यांनी त्यांच्यावर मशिनगनचा मारा केला. पहिल्या काही पावलांतच संजय कुमार यांच्या हातावर आणि छातीत गोळ्या घुसल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी शत्रूचे बंकर गाठले आणि तीन पाकिस्तानी सैनिकांना हातोहातच्या लढाईत यमसदनी धाडले. यानंतर त्यांनी तेथील एक मशिनगन उचलली आणि शत्रूच्या दुसऱ्या बंकरकडे गेले. अचानक आलेल्या या हल्ल्याने गांगरुन गेलेले पाकिस्तानी सैनिक काही करण्याच्या आत संजय कुमारांनी त्यांना ठार मारले. हे पाहून चवताळलेल्या भारतीय सैनिकांच्या प्लाटूनने हल्ला चढवला आणि उरलेल्या पाकिस्तानी सैनिकांना ठार करीत आणि पळवून लावीत एरिया फ्लॅट टॉप काबीज केला.

संजय कुमार यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.

सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF , एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी -
7 वर्षाची अखंडित यशस्वी परंपरा...!
9850845094 /9403803087 /8668502903