Monday, April 13, 2020

स्वामी विवेकानंद यांचा जीवनातील 3 प्रेरक प्रसंग


​1.मनःशांती मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे

अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करून थकलेला एक तरुण स्वामी विवेकानंद
यांचा जवळ आला आणि म्हणाला, "स्वामीजी तासन्  तास बंद खोलीत बसून मी ध्यान धारणा करतो, परंतु माझा मनाला शांती लाभत नाही."

त्यावर स्वामीजी म्हणाले, "सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव, आपल्या जवळपास राहणाऱ्या दुःखी, रोगी व भुकलेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर."

यावर त्या तरुणाने त्यांना, "एखादा रोग्यासी सेवा करताना मीच आजारी पडलो तर?" असा प्रश्न विचारला.

विवेकआनंद म्हणाले, "तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते, म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नये. हाच मनःशांती मिळवण्याचा जवळचा व उत्तम मार्ग आहे."

2.संकटांना घाबरू नका

बनारस मध्ये असताना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पाय वाटेने चालले होते लाल तोंडाची माकडे त्यांचा पाठीमागे लागली. त्यांचा पासून स्वतःचा बचाव करण्या साठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेना.

इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठुन तरी एक साधूचा आवाज ऐकू आला. 'पळू नको! त्यांना सामोरे जा!', असे ते त्यांना सांगत होते.

त्यांचा सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे झाले. मग काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवातून स्वामीजींना मोठा धडा मिळला होता की, संकटांना घाबरून पळू जाण्यापेक्षा त्यांना धैर्याने तोंड दिले पाहिजे.

तात्पर्य: संकटांना कधीही घाबरून नये . त्यांना धैर्या ने सामोरे जाता आले पाहिजे.

3.ठाम निर्धार

एकदा जयपूरला असतांना स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी तेथील एका प्रसिद्ध संस्कृत पंडिताकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र नाना प्रकारे समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते.

तीन दिवस सततच्या प्रयत्नांनंतर पंडितजी म्हणाले, "पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा मी आपल्याला एकही सूत्र समजावून देऊ शकलो नाही. त्यामुळ माझा जवळ शिकण्याने आपल्याला लाभ होईल, असे मला वाटत नाही,"

पंडितजींचे बोलणे ऐकून वेवेकानंदांना फार वाईट वाटले. जोवर या सूत्राचा अर्थ समजणार नाही, तोवर जेवण-खाण सर्व बंद! असा ठाम निर्धार त्यांनी केला. त्यांनी एकाग्र चित्ताने त्या सूत्रातील भाष्य समजून घेतले. नंतर ते पंडितजींकडे गेले. त्यांच्याकडून सूत्रांचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींनाही आश्चर्य वाटले.

तात्पर्य: ठाम निर्धार केला की, कुठलीही गोष्ट असाध्य नसते.
सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग वर्दे गाव
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य यशस्वी अकॅडेमी -सिग्मा करिअर अकॅडेमी सिंधुदुर्ग
9850845094 /9403803087 /8668502903


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.