होमिओपॅथीक औषध घ्या व कोरोनापासून स्वतः ला वाचवा.
अर्सेनिकम अल्बम कसे काम करते. काय आहे ते.
अर्सेनिकम अल्बम हे मूलद्रव्य, एक मेटलॉईड आहे. म्हणजे ना धड धातू ना अधातू. जसा हा कोविड १९ किंवा कुठलाही व्हायरस, ना धड सजीव ना धड निर्जीव.
पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात आहे. पाण्यातही असते थोड्या प्रमाणात. त्याची काही अडचण नसते. काही ठिकाणच्या पाण्यात त्याचे प्रमाण जास्त असते. तेथे त्यामुळे बरेच रोग निर्माण होतात.
इलेक्ट्रोनिक्स अर्सेनिकवरच चालते. लाईट एमिटिंग डायोड म्हणजेच LED याच्या पासूनच बनवतात.
जसे आयुर्वेदात जशास तसे, किंवा विषाला विष मारते असे म्हणतात. तसेच होमिओपॅथी मध्ये सुद्धा आहे. म्हणजे नाकातून तुपासारखा पदार्थ येत असेल तर थेंबभर नाकात तूप टाकायचे.
मग ते आत जाऊन आतील नाजूक त्वचेवर एक पातळ थर तयार करते आणि रोग जंतूंपासून त्वचेचा बचाव करते आणि सर्दी बरी होते.
तसेच होमिओपॅथीचे मुल तत्व आहे. एखादा पदार्थ शरीरात गरजेपेक्षा जास्त झाला की शरीरात जी लक्षणे उत्पन्न होतात ती लक्षणे त्याच पदार्थाचे विरळीकरण म्हणजे डायल्युशन करून दिल्यास ती नाहीशी होतात असा तो सिद्धांत ढोबळ मानाने आहे.
उदाहरणार्थ शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाले तर तहान लागते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते.
जर शरीरात जास्त झालेले पाणी जर मिठामुळे असेल तर सूक्ष्म प्रमाणातील मीठ दिले तर ते पाणी आणि त्याचबरोबर ते मीठ बाहेर टाकले जाते. या औषधाच्या सुक्ष्मतेला किंवा विरळीकरणाला पोटन्सी असे म्हणतात.
हि पोटन्सी कशी वाढवतात? तर औषधाचे द्रावण बनवतात. त्याला मदर टिंक्चर, म्हणतात. मग एक भाग मदर टिंक्चर आणि ९९ भाग द्रावण घेऊन आपटून आपटून ते एकजीव करतात. हि झाली एक पोटन्सी. म्हणजे त्यात मुळ औषध एक टक्काच राहते.
त्यातील एक भाग घेऊन परत हीच प्रक्रिया केली की पोटन्सी दोन झाली. म्हणजे त्यात मूळ औषध हजारात एक असे झाले. असे तीस वेळा केले की ३० पोटन्सी झाली.
अर्सेनिकम अल्बम ३० यातील ३० चा अर्थ त्या औषधाची पोटन्सी ३० आहे असा आहे. ३०, ३०c, ३०CH सगळ्याचा अर्थ एकच. म्हणजेच त्या औषधात अर्सेनिकचा एखादाही अणु सापडणे मुश्कील. मग त्याचा विषारीपणा कुठून असणार.
त्याच्याशी कुठलीही केमिकल रिएक्शन होणारच नाही. आपल्या घराच्या पाण्याच्या टाकीत त्यापेक्षा खूपच जास्त अणु असतील. म्हणून ते औषध विषारी आहे असे म्हणणे हा गैरसमजाचा भाग आहे.
मग साहजिकच प्रश्न निर्माण होईल कि मग त्याला अर्सेनिक का म्हणायचे? इथेच आधुनिक विज्ञानाचा घोळ सुरु होतो.
"वाण नाही पण गुण लागणे" अशी मराठीत म्हण आहे. तसे या औषधाचा गुण त्या द्रावणाला लागतो. हा त्या द्रावणाचा तसेच पाण्याचा गुणधर्म आहे. भारतीय तत्वज्ञानात स्थूल आणि सूक्ष्म हि संकल्पना असल्याने भारतीयांना ते कळायला कठीण जाऊ नये.
आधुनीक विज्ञानाला अजून सूक्ष्म कळायला, त्याची मोजपट्टी मिळालेली नाही. जेंव्हा मिळेल तेंव्हा अमेरिका आम्हीच सूक्ष्माचा शोध लावला असे म्हणेलच.
तर अर्सेनिकची जी लक्षणे आहेत. अनेक आहेत ती. तशी लक्षणे शरीरात दिसल्यावर जर हे औषध दिले तर ती लक्षणे नाहीशी होतात. अर्थात प्रत्येक औषधाचा डोस, ते कितीवेळा द्यायचे, त्या साठी त्याची पोटन्सी काय असावी याचा अतिशय बारकाईने अभ्यास केल्यावर मग ते औषध म्हणून सिध्द किंवा प्रुव्ह झाले असे म्हटले जाते.
इतरही अनेक पैलू आहेत. पण आत्तापुरते हे पुरे.
आयुर्वेदातील वात पित्त आणि कफ ह्या तीन प्रकारच्या प्रकृती माहिती असतात. तशाच होमिओपॅथी मध्येही तीन प्रकारच्या प्रकृती असतात. त्यामुळे औषधेही त्या त्या प्रकृतीची वेगवेगळी असतात. त्यात वंशाचा म्हणजे रेसचाही फरक पडतो.
त्यामुळे आधुनिक वैद्यकाच्या दृष्टीने एकच रोग असलेल्या तीनही प्रकारच्या रुग्णांना एकच औषध असे मानले जाते. पण आयुर्वेद आणि होमिओपॅथी मध्ये तीनही रुग्णांना वेगवेगळी औषधे दिली जातात. अर्थात काही औषधे तीनही प्रकृतीच्या लोकांना लागू पडणारीही असतात.
आधुनिक विज्ञान साधारण पासष्ठ टक्के रुग्ण बरे झाले कि औषध बरोबर आहे असे मानेल. आणि उरलेल्यांना हे औषध लागू पडत नाही का? मग बदलून देऊ असे म्हणून मोकळे होते. दुसरे औषध उरलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीसाठी असेल तर ते लागू पडते.
पण सगळ्यांसाठी एकच पेटंटेड औषध असे मानणाऱ्या औषध कंपनीला ते मान्य होत नाही. असे कसे असे कसे? हा त्यांचा प्रश्न होतो. म्हणूनच आधुनिक वैद्यकाच्या पद्धतीने आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषधांच्या टेस्ट होऊच शकत नाहीत.
सबघोडे बारा टक्के हा प्रकार आयुष औषधात नसतोच. आणि त्यावरच आधुनिक वैद्यक अडून बसलेले आहे. त्यांची रिसर्च करण्याच्या पद्धतीत ते औषध लागू न पडणाऱ्या लोकांना अपवाद म्हणून मोकळे केले जाते. आणि हा प्रकार किमान दहा टक्के असतो, हेच मुळी अवैज्ञानीक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
सर्वे सुखिन सन्तु आणि बहुजन सुखाय असा तो फरक आहे.
मग प्रश्न पडतो कि मग असे असताना होमिओपॅथी मध्ये सगळ्या लोकांसाठी प्रतिबंधात्मक एकच औषध कसे?
तर जेंव्हा एखादा वात प्रकृतीचा रोग कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये बळावतो तेंव्हा त्याची शरीर प्रकृतीही वातमय होत जाते.
तसेच साथीच्या रोगांमध्ये ती लक्षणे निर्माण झाल्यावर सगळ्यांची प्रकृती तशीच होत जाते. म्हणून एकच प्रतिबंधात्मक औषध सगळ्यांना लागू पडते. म्हणूनच आधुनिक औषधे बर्याच लोकांना लागू पडतात. सगळ्या नाही.
आता या कोविड१९ या विषाणू मुळे होणाऱ्या आजारात जी सगळी लक्षणे आहेत ती सगळी लक्षणे अर्सेनिक औषधाचीही आहेत. काही जण म्हणतात, मला डायरियावर अर्सेनिक दिले होते. मग घशाच्या आणि छातीच्या दुखण्यावर हे कसे चालेल?
तर कोविद१९ मध्ये एक दोन टक्के लोकांना डायरीयाही होतो हे त्यांना माहित नसते.
तर अर्सेनिक औषध घेतल्यावर काय होते?
हे औषध घेतल्यावर त्याने सूक्ष्म प्रमाणात तीच लक्षणे तयार होतात. आपल्याला ती कळणारही नाहीत. पण शरीराच्या हेरखात्याला ते लगेच कळते त्यांना कोविड१९चे व्हायरस आल्यासारखे वाटते आणि त्यासाठीची प्रतिजैविके, म्हणजेच ऍंटीबॉडीज तयार होऊ लागतात. हि कोविड १९ वर लागू होणारीच असतात.
हि प्रतिजैविके शरीरभर कोविड १९ च्या विषाणूंना शोधत राहतात. आणि महिन्या दोन महिन्यांनी विरून जातात. म्हणून हे औषध महिन्यानंतर साथ राहिलीच तर परत घ्यायचे असते.
मधल्या काळात जर काही विषाणू शरीरात शिरलेच तर लगेच या आधीच तयार असलेल्या सैन्याने त्यांचा नाश होतो. म्हणजे हि प्रतिजैविके त्या व्हायरस बरोबर स्वतःला जोडून त्याचे एका निरुपद्रवी परमाणु मध्ये रुपांतर करते. आणि सैन्यालाही कळते खबर पक्की होती. आणि मग ते आपल्या मेमरीत असे विषाणू आले होते त्यांना या ब्रिगेडच्या सैनिकांनी नेस्तनाबूत केले असे लिहून ठेवले जाते.
मग शरीर त्या विषाणूला भविष्यात केंव्हाही प्रतिकार करू शकते. जसे पुन्हा ते अतिरेकी आले कि त्या ब्रिगेडची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु होते आणि लगेच त्यांचा फडशा पाडला जातो.
म्हणून लस किंवा नोसोड घेतल्यावर दीर्घकाळ त्या रोगाला होऊ देणार नाही अशी शरीराची यंत्रणा तयार होते. अर्सेनिक हे औषध असल्याने महिन्याभरानंतर ते परत घ्यावे लागते. ह्याचा तीन दिवसांचा कोर्स झाल्यावर कोणी बाधित झालेला नाही.
नोसोड म्हणजे होमिओपॅथीची त्या रोगावरची लस. लहान मुलांना लसी टोचल्या नंतर थोडा ताप वगैरे येतो तसे होमिओपॅथी नोसोड मध्ये होत नाही हा महत्वाचा फायदा आहे. आणि स्वस्तही असते.
आता लक्षणे तीच असल्याने कोविड्चे संक्रमण झाल्यावर पॉझीटिव्ह झाल्यावर मग परत अर्सेनिकच घ्यायचे का? घेतले तर फायदा होईलच पण झपाट्याने बरे होईलच असे सांगता येणार नाही. त्याचा डोसही जास्ती वेळा द्यावा लागेल.
कारण त्याच्या प्रकृती प्रमाणे सगळी लक्षणे दिसतीलच असे नाही. मग त्याची लक्षणे बघून त्याच्या प्रकृतीमानाचा विचार करून अचूक औषध दिले कि सहा तासात आराम पडायला लागून दोनचार दिवसात तो निगेटिव्ह होऊन बरा होईल.
अर्थात आधीच अर्सेनिकचा डोस घेतला असल्यास बाधा होण्याची शक्यता लाखात एक. झालीच तरी लक्षणे सौम्यच राहतील.
म्हणूनच होमिओपॅथीचा मोठ्या प्रमाणात आणि लवकर वापर सुरु केलेल्या इराण, जर्मनी आणि केरळ मध्ये रुग्णांचा आलेख उतरणीला लागला आहे. संपत आला आहे. आठवड्याभरात केरळ करोना मुक्त होईल.
कँफर 1M म्हणजे आपला भीमसेनी कापूर, त्याचीही चर्चा केली जात आहे. मुळात त्याचे प्रयोग इराण मध्ये केले गेले आहेत. भारतात अर्सेनिकाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन त्याची योग्यता सिध्द झाली आहे.
इराण हि भारता पेक्षा वेगळी रेस आहे. भारतातील पारशी लोकांकडे बघितल्यावर ते लक्षात येतेच. त्यामुळे ते येथेही प्रभावी ठरेलच असे नाही. तेही वापरून पाहायला हरकत नव्हती. पण ६ मार्चलाच आयुष मंत्रालय आपल्या निष्कर्षांवर पोहोचले होते.
मग आपल्या येथे काय केले पाहिजे? काय करायला हवे होते हा भाग सोडून देऊया. फिजीशियनचे काम सर्जनला दिल्यावर जे व्हायचे ते झालेच आहे. अजूनही महाराष्ट्रात कोविड१९ वर होमिओपॅथीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत नाही.
मराठी आणि गुजराथी हि एक वेगळी रेस आहे. ज्वारीची भाकरी खाणारी ही मंडळी. रबरी पदार्थ जास्त असलेला गहू त्यांना पचत नाही. सरसोंका तेल ते सहन करू शकत नाहीत.
या रेसमध्ये मृत्युदर सगळ्यात जास्त आहे. संख्याही जास्त आहे. गुजराथ मध्ये आयुष औषधांचा वापर सुरु झाल्यावर मृत्युदर सुधारला आहे तसेच लोकांमध्ये आयुष औषधे वाटल्याने संख्या कमी राहिली आहे.
केरळ हा कोकणचाच शेवटचा भाग आहे. मराठी लोकांना ते पटत नसले तरी ते स्वतःला कोकणीच समजतात. सह्याद्री आणि समुद्रामधील चिंचोळी पट्टी, कोकण. खरेतर महाराष्ट्र आणि गुजराथ प्रमाणेच केरळमध्येही परदेशातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे.
तसेच बहुतेक तरुण वर्ग बाहेरगावी असल्याने वृद्धांची संख्या जास्त आहे. तरीही १०० जण बरे झाले तर एखादाच मृत्युमुखी पडतो. आणि महाराष्ट्रात तीनचार जण बरे झाले तर एकाचा मृत्यू होतोय. महाराष्ट्रात कोविड योद्ध्यांचाही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत सहभाग आहे.
आज महाराष्ट्र वगळता भारताचा आणि गुजराथचाही रुग्ण दुप्पट होण्याचा वेग वीस दिवसांवर गेला आहे. तर महाराष्ट्र कित्येक दिवस दहा दिवसांचा उम्बरठाही ओलांडू शकला नाही.
गुजरातचा मृत्यू दर झपाट्याने भारतापेक्षाही कमी होईल असे दिसत आहे.
आपण एक हजार रुपयाच्या लसीची वाट बघत थांबू शकत नाही. सरकारी पातळीवर सुरु झाले तर अर्सेनिक ३० माणशी रुपया पेक्षाही कमी पडेल. १० टक्क्यांपेक्षाही जास्त रुग्ण कोविड योद्धे आहेत. त्यांच्यात अर्सेनिकचे वाटप सुरु झाले पाहिजे. जेणे करून त्यांच्यात प्रतिकारशक्ती बरोबरच आत्मविश्वासही वाढेल.
जे जे तयार होतील त्या आयुष डॉक्टरांना त्यांच्या पद्धतीने रोगांवर मुक्त पणे उपचार करू दिला पाहिजे. आमच्या कडे औषध नाही पण तुम्ही आमच्याच पद्धतीने मरा हा हेका सोडून दिला पाहिजे.
पुणे, शिर्डी येथील पालिकांनी आपल्या कर्मचार्यांना अर्सेनिक ३० वाटले आहे. पोलिसांनाही वाटण्याची व्यवस्था होत आहे. मुंबईलाच काय अडचण आहे कळत नाही. कोणी झारीतील शुक्राचार्य असतील तर त्यांना बदलले पाहिजे.
मालेगाव मधील होमिओपॅथी औषधांची दुकाने उघडू दिली पाहिजेत. लोकांना हवी आहेत ती औषधे. आज महाराष्ट्रभर लोक जागे झाले आहेत. उत्तुंग पॅटर्न सगळी कडे मोठ्या प्रमाणावर राबवला जात आहे. पण अजूनही संपर्कात आलेल्या लोकांना वेगळे ठेवले तरी त्यांना अर्सेनिक ३० दिले जात नाही हे बरोबर नाही.
आता उत्तुंग पॅटर्नच्याही पुढे जाऊन सगळ्या लोकांना अर्सेनिक ३० वाटले पाहिजे. दाट वस्त्यांपासून हे काम सुरु केले पाहिजे. आपापल्या नगरसेवकांवर आणि आमदार खासदारांवर यासाठी दबाव आणला पाहिजे. जे अन्न आणि रेशन देऊ शकतात ते एक रुपयाच्या गोळ्या नाही देऊ शकत?
उपयोग नाही झाला तर एकच रुपया फुकट जाईल. पण उपयोग झाला तर किती तरी जीव वाचतील. उद्योग लवकर सुरु झाले तर किती उत्पन्न वाढेल. हजार रुपयाची लस येईपर्यंत थांबता येणार नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे.
चला अर्सेनिक वाटायला सुरु करूया. औषधाचे नाव अर्सेनिक अल्बम ३०. कुठल्याही होमिओपॅथीच्या दुकानात मिळेल, किंवा डॉक्टर कडे मिळेल. अनेक जनरल मेडिकल स्टोर्स मध्येही मिळेल.
होमिओपॅथी डॉक्टरांच्या मदतीने आपणही मोठ्या प्रमाणात बाटल्यात ते भरू शकाल आणि वाटूही शकाल. हाफ ड्रामच्या बाटलीत ३० नंबरच्या गोळ्या भरायच्या आणि त्यात चार थेंब औषध टाकायचे आणि झाकण लावून हलवायचे. ह्या बाटलीत पाच जणांच्या कुटुंबाला पुरेल एव्हढे औषध तयार होते.
प्रत्येकाने आपल्याला करोनाची बाधा होऊ नये म्हणून हे घ्यायचे, असे आयुष मंत्रालयाने सुचवले आहे. मोदींनीही सुचवल्रे आहे. अगदी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही हे देता येते.
लहान बाळांना तीन ऐवजी एकच गोळी द्यायची. बाकी घरातील सर्वांनी सकाळी चूळ भरून तीन गोळ्या घ्यायच्या. गोळ्यांना हात लावायचा नाही. झाकणात घेऊन सरळ जिभेवर टाकून चोखायच्या. मग अर्धा तास ब्रश खाणे पिणे काही करायचे नाही. पाणी प्यायला हरकत नाही. असे फक्त तीन दिवस करायचे. दिवसातून फक्त एकदाच सकाळी एकदम तीन गोळ्या घ्यायच्या.
घराजवळच्या होमिओपॅथी दुकानात किंवा डॉक्टर कडे मिळेल. बरेच जनरल मेडीकलवालेही ठेवतात. किंवा गुगल वर "homeopath medical near me" असा सर्च करायचा.
धुळ्याची पोलीस कंपनी मालेगावला कार्यरत होती. मालेगावला कार्यरत असणाऱ्या इतर कंपन्यातील पोलिसांना बाधा झाली. पण धुळ्याच्या ८२ पैकी एकाच पोलिसाला बाधा झाली इतरांना नाही. कारण इतरांनी हे औषध घेतले होते. एकाने घेतले नव्हते त्यालाच फक्त बाधा झाली. आता आपणच आपल्याबद्दल विचार करावा.
याचे काहीही साईड इफेक्ट नाहीत. सेफ आहे. आपण सगळे सेफ होऊया आणि आपल्या देशालाही या दहशतीतून मुक्त करूया.
धनंजय केशव केळकर
९८१९५२६७५६ / ९८३३४१०२३१
सौजन्य.. डॉ. संजीव लिंगवत, होमिओपॅथ, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.